About us

An integral of Human life that enriches the same! As said by the famous Marathi writer P.L. Deshpande, “the activity to eke your living will make you live, but a comradeship with an any art will teach you the reason for what; you should live!”

Undoubtedly, an art gives pleasure. But if it said for entertainment, Drama & Dance like arts come prominently in front.

A Drama can not withstand without a character where as a Dance like art forms without a concept feels incomplete. charachteristics or a concept decides it’s own

‘Roop’ that is form. And a costume makes that form appear exactly in front of audience. That means, it’s a costume that delivers the

‘Darshan’ that is intangible presentation of that ‘Roop’ of a character or a concept!

And that’s what we are….RoopDarshan’.

While delivering an appropriate appearance with respect to character or concept, it’s a classic journey starting fron head up to nails. It includes hair vig, costume, matching ornaments, jewellery & property like weapons, accessories etc.

And within that if it’s a newer character or newer concept, it’s a great challenge to work with. And that’s why, department in sink with concepts, their sub departments & going ahead sub-sub departments according to colors, sizes, variety etc. are the highlights of Roopdarshan.

Thus, need base costume selection is made easy & convenient from customers & artist point of view. For us,

Roopdarshan is not just a name.

It’s a commitment! Everyday ut efforts for the same to live with. The efforts will receive the response, is what we believe.

At Roopdarshan we feel fortunate that our motive of; and for living is same, as said by P. L. Deshpande! Yours Roopdarshan!

मानवी जीवन समृद्ध करणारं मानवी जीवनाचं अविभाज्य अंग! इतकं की “उपजिविकेचा उद्योग तुम्हांला जगवेल. परंतु कलेशी जमलेली मैत्री मात्र तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.!” – पु.ल. देशपांडे.

कला आनंद देतेच. त्यातही मनोरंजन म्हटलं की, नाट्य आणि नृत्य असे कला प्रकार प्रामुख्याने समोर येतात. नाट्य हे व्यक्तीरेखेशिवाय, तर नृत्य किंवा तत्सम प्रकार संकल्पनेशिवाय उभे राहू शकत नाहीत.

एखादी व्यकतिरेखा किंवा संकल्पना त्याचे त्याचे रूप ठरवते आणि वेशभूषा ते रूप प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष उभे करते. अर्थात व्यक्तिरेखा किंवा संकल्पनेच्या रूपाचे दर्शन घडवते, तीच खरी वेशभूषा! म्हणजे आम्ही ‘रूपदर्शन’! साजेसं रूप उभं करताना, केवळ एक व्यक्तिरेखा किंवा संकल्पना म्हणून विचार केला तर तो अगदी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत एक अभिजात प्रवास असतो. ज्यात केशभूषा, वेशभूषा, दागिने, आयुध ं, आभूषणं, उपसाधने इ.चा समावेश होतो. त्यातही नवनव्या व्यक्तिरेखा आणि संकल्पना एक आव्हान असतं! म्हणूनच, संकल्पनेनुसार विभाग, त्यांचे उपविभाग आणि पुढे जाऊन रंग, आकार, विविधता इ. उप-उपविभाग हे ‘रूपदर्शन’ चे खास वैशिष्ट्य आहे. जेणेकरून ग्राहकांचा, कलाकारांचा त्यांच्या गरजेनुसार वेशभूषेपर्यंतचा प्रवास सुकर होतो! ‘रूपदर्शन’ हे केवळ नाव नसून, आमची कटिबद्धता आहे! जी नियमित निभावण्याचा आणि जगण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. या प्रयत्नांना आपला प्रतिसाद लाभेल असा विश्वास वाटतो.

‘रूपदर्शन’ मध्ये आम्ही नशीबवान आहोत की, पु. ल. देशपांडेंच्या सांगण्याप्रमाणे आमचं जगण्याचं आणि का जगायचं याचं प्रयोजन एकाच आहे! आपले ‘रूपदर्शन’!